न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- बांधकाम साईटवर काम करत असताना पहिल्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना २६ डिसेंबर २०२१ रोजी शिवार चौक, पिंपळे सौदागर येथील जी. के. कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटवर घडली.
राजू ऊर्फ पितल पंकज चक्रवर्ती (वय २५, रा. बागुला नादिया, पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगवी पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपास केल्यानंतर निष्काळजीपणे मृत्यू घडविल्याप्रकरणी जी. के. बिल्डर्स, लेबर सुपरवायझर आणि कामगार निरीक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जी. के. कन्स्ट्रक्शन साईटवरील मुख्य बांधकाम व्यावसायिक व लेबर सुवायजर यांनी कन्स्ट्रक्शन साईटवर कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे काम करताना कामगार राजू चक्रवर्ती पहिल्या मजल्यावरून खाली पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. गोसावी तपास करीत आहेत.