- अन्यथा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत; पालिकेची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने इंद्रायणीनगर भाजी मंडईमधील भाजी मंडईचे ७२ गाळे आणि १८ फ्रुट गाळे अशी एकूण ९० गाळे वितरणासाठी उपलब्ध केले होते. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या गाळयांसाठी अल्पप्रतिसाद आल्यामुले प्रभाग कार्यालयाकडुन त्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार एकुण ६२ पात्र लाभार्थी निश्चित झाले होते.
त्यांना गाळे वितरीत केल्यानंतर पुन्हा अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये इंद्रायणीनगरमधील भाजी विक्रेत्यांना प्राधान्य देऊन प्राप्त अर्जामध्ये सोडत काढण्यात आलेली होती. त्यानुसार ९० गाळे वितरित झाले आहेत. ज्यांना गाळे मंजुर झाले आहेत त्यांनी सर्व कराव्यतिरिक्त निव्वळ भाडे र.रु. १.७११ याप्रमाणे सहा महिन्याचे भाडे १०,२६६ अनामत भरून भाडेकरारनामा करून घ्यावा.
अद्याप ५४ लोकांनी रक्कम भरलेली आहे; परंतु भाडेकरारनामा करून दिलेला नाही. ज्यांनी रक्कम भरलेली नाही त्यांनीही १५ फेब्रुवारीपर्यंत रक्कम भरून भाडेकरारनामा करून द्यावा, अन्यथा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे पालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.