न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२२) :- शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महागाई विरोधात आज शुक्रवारी पिंपरीतील आंबेडकर चौकात निषेध आंदोलन केले. केंद्र सरकाच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, राजू सावळे, रुपेश पटेकर, विशाल मानकरी, सुशांत साळवी, सचिन शिंगाडे, दत्ता देवतरासे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, सुजाता काटे, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, अविनाश तरडे, विशाल साळुंखे, अनुज महाजन, प्रफुल्ल कसबे, नितीन चव्हाण, नारायण पठारे, आकाश पांचाळ,राजू भालेराव, विनोद भंडारी, नारायण पठारे, फैयाज नदाफ, ॲलेक्स मोजेस, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, हेमंत डांगे, बाळा दानवले, शिशीर महाबळेश्वरकर, जय सकट, प्रदीप घोडके, निलेश नेटके, आकाश लांडगे, रॉबिन त्रिभुवन, विशाल साळुंखे, गणेश उज्जनकर, परमेश्वर त्रिमले, नीरज कांबळे, कृष्णा महाजन, स्नेहल बांगर आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, गेल्या नऊ वर्षांपासून देशात महागाई वाढत आहे. काँग्रेससारख्या पक्षाने सत्तेत राहून महागाई आटोक्यात आणली नाही म्हणून मोदी सरकार सत्तेवर आले. या सरकारने मागे न हटता महागाईच्या सीमा ओलांडल्या. सिलेंडर, खाद्य तेल, पेट्रोल, डिझेल, अन्यधान्य, रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची भाववाढ करून तोंडचे पाणी पळवले आहे.












