न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२२) :- वाल्हेकरवाडी रोड येथे इमारतीचा काही भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. कामगार , त्याची पत्नी व दोन मुले बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकला होता. अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना कामगाराचा मृत्यू झाला. धरमराज (वय ३८ वर्षे) असे या कामगाराचे नाव आहे.