- महिलांसह प्रवाशांना तिकीटदरात सवलत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२२) :- पीएमपीकडून बसचा वापर जास्तीत जास्त करावा याकरिता पीएमपीएमएलच्या वर्धापन दिनानिमित्त १८ एप्रिल रोजी ‘ बस – डे ‘ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी महिलांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. शिवाय अन्य प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याचा विचार प्रशासन करत आहे.
उपक्रम वर्धापन दिनाच्या निमित्ताने १४ ते २३ एप्रिल २०२२ दरम्यान पीएमपीकडून विविध राबविण्यात येणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली. यावेळी सहव्यस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरुरे, जनरल मॅनेजर सुनील गवळी, मुख्य समन्वयक सुनील बुरसे, जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे उपस्थित होते.
मिश्रा म्हणाले, प्रवासासाठी ‘ नागरिकांनी जास्तीत जास्त पीएमपीएलचा वापर करावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत नागरिकांमध्ये वाहतूक जनजागृती केली जाईल. १४ ते २३ तारखेपर्यंत हा उपक्रम महिलांसाठी सुरू राहणार आहे. यामध्ये वेबिनार, चर्चासत्राच्या माध्यमातून देवाण – घेवाण करणे, शिवाय विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.