- विविध कार्यक्रमांसह भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२२) :- चैत्र पौर्णिमा रामभक्त हनुमान जयंती प्राधिकरण आणि बिजलीनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बिजलीनगर येथील हनुमान मंदिरात आणि प्राधिकरणातील सुर्यमुखी श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ लागली होती.
यावेळी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांसह भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. दरवर्षी जयंतीनिमित्त हा उप्रकम आयोजिण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे संतोष सौंदणकर यांनी दिली.
उपक्रमात श्रीनिवास मांढरे, सुनील पवार, अरविंद पाटील, धर्मेंद्र राठोड, वासुदेव महाले, निलेश मानकर, अतुल बुर्डे, गोपाळ गिरी, अरुण ढाके, हितेश नेमाडे, ओम परदेशी, गणेश गाडे, मनोहर सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.
















