- तरुणाचा मुलीसह तिच्या आई वडिलांना त्रास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२२) :- मुलीने फोनवर बोलावे यासाठी आरोपीने तिला त्रास दिला व जबरदस्ती हात पकडून ‘मेरे से बात करो नहीं तो देख लुंगा’ अशी धमकी दिली. मुलीच्या आई आणि वडीलांना वारंवार फोन करून मुलीला फोनवर बोलण्यासाठी सांगितले.
मुलीच्या आई आणि वडीलांनी नकार दिल्यावर त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ४ ते १७ एप्रिल या दरम्यान पिंपरीत हा प्रकार घडला. १५ वर्षीय पिडीत मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राहुल रमेश पार्चा (वय २२, रा. पिंपरी) या आरोपीला अटक केली आहे.