न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- दोन महिलांना आरोपींनी वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. हा प्रकार गुन्हे शाखा युनिट चारला समजला असता पोलिसांनी गुरुवारी रात्री पावणे बारा ते शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या कालावधीत हॉटेल के इनवर छापा मारला.
यात पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपींकडून ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १९ मे) रात्री भूमकर चौक येथील हॉटेल के इन येथे करण्यात आली.
पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पायल, हिरा, हॅप्पी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.