न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२२) :- कासारसाई येथील धरणात बुडून आज सकाळी एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शिवदुर्ग रेस्कू पथकाने शोधमोहीम राबवत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
प्रदूम गायकवाड (वय १४, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे या मुलाचे नाव आहे. आज सकाळी प्रदुम हा कुटुंबातील सदस्यासह कासारसाई धरण परिसरात आला होता. पाण्यात उतरल्यानंतर पाय घसरुन पडल्याने तो बुडाला.
ही माहिती समजल्यानंतर लोणावळ्यात शिवदुर्ग मित्रचे रेस्कू पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्याठिकाणचे स्थानिक नागरिक यांच्यासह शिवदुर्गच्या पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.सी. गावित पुढील तपास करत आहेत.