न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२२) :- ”फुकट लोन करून देतो”, असे आमिष फिर्यादीला दाखवले. फिर्यादी यांना विजय सेल्स, वाकड येथे नेऊन ५२ हजार ९७८ रुपयांचे लोन करून आयफोन फिर्यादी यांच्या नावे घेतला. तुम्हाला एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगून मोबाईलचा अपहार करून आरोपी फरार झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
१३ फेब्रुवारी २०२२ रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी महेश प्रकाश ढगे (वय ३९, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी शनिवारी (दि. २१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हिजवडी पोलीस तपास करीत आहेत.