- उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्रीराज पवारचा सन्मान..
- विठाई वाचनालयाच्या पदाधिका-यांनी श्रीराजच्या यशाचे केले कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२२) :- श्रीराज पवार याने अबॅकस मॅथ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण पिंपळे सौदागरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अबॅकस मॅथ स्पर्धेतील त्याचे यश आपल्या पिंपळे सौदागरच्या विकासाची ग्रोथ अधोरेखीत करणारे आहे, अशा शब्दांत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे यांनी श्रीराजचे कौतुक केले.
उन्नति सोशल फाऊंडेशनच्या विठाई वाचनालयात श्रीराज पवार याच्या यशाबद्दल कुंदाताई भिसे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय (आबा) भिसे, डॉ. सुभाषचंद्र पवार, रमेश वाणी, अरविंद पाटील, प्रा. वाट्टमवार, ढाकणे, विलास जोशी, देवराव वैद्य, रमेश चांडगे आदी उपस्थित होते. यावेळी श्रीराजच्या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्वांनी अभिनंदन केले.
कुंदाताई भिसे म्हणाल्या की, पिंपळे सौदागरच्या सर्वांगीन विकासात आम्ही सहभाग घेत आलो आहोत. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक, आर्थिक, आद्यात्मिक, सांस्कृतिक अशा असंख्य क्षेत्रात नागरिकांशी संवाद साधून आम्हाला योगदान देता आहे. त्यातूनच वाचक प्रेमींची आवड जोपासण्यासाठी विठाई वाचनालयाच्या माध्यमातून पिंपळे सौदागरमधील नागरिकांसाठी पुस्तकाचे भांडार उपलब्ध करून दिले.
वाचनालय आम्ही सुरू केले असले तरी त्याचे अध्यक्ष पद सन्मानाने भूषविणारे डॉ. सुभाषचंद्र पवार यांच्या संस्काराखाली घडलेली पिढी उत्तुंग यश मिळवताना दिसत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या संस्कारात घडलेला त्यांचा नातू श्रीराज याने अबॅकस मॅथ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून चांगल्या संस्काराची पावती दिली आहे. इतरांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे, असेही कुंदाताई म्हणाल्या.















