न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२२) :- तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या (सोमवारी) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्वाचा समजून क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला.
याकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.















