- चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२२) :- तळवडेतील ज्योतिबानगर येथील गट क्रमांक १२० येथे फिर्यादी व त्यांचे वडील हे गवत व वेल काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी ”ही जागा आमच्या मालकीची आहे”, असे म्हणत फिर्यादीची कॉलर पकडून त्यांना ढकलून देत हाताने मारहाण केली. यामुळे फिर्यादीच्या तोंडाला आणि डोळ्याला दुखापत झाली.
त्यानंतर पुन्हा फिर्यादीला रस्त्यावर नेवून खाली पडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दुसऱ्या आरोपीनेही फिर्यादीला मारहाण केली. तसेच ”मी कोणत्या प्रकारचा गुंड आहे तुला दाखवतो. खल्लास करून टाका”, असे म्हणाला. याप्रकरणी पराग जयवंत जाभूळकर (रा. सेक्टर क्रमांक २८, प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार प्रशांत संजय कोतवाल, सागर एकनाथ कोतवाल यांना पोलिसांनी अटक केली असून अक्षय संजय कोतवाल (सर्व रा. ज्योतिबानगर, तळवडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


















