न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- च-होली फाटा येथून आळंदीकडे जात असताना आरोपीने त्यांना थाबवले. त्यांच्या कानाखाली मारली. दुसऱ्या आरोपीनेही फिर्यादीला मारहाण करून रोकड काढून घेतली. त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादीला खाली पडून लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. तर इतर आरोपीने फिर्यादीचा अठरा हजारांचा मोबाईल काढून घेतला.
सुनील गोविंद पवने (रा. आळंदी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. सतीश श्रीरंग घोडके (वय ३६. रा. केळगाव, आळंदी), दीपक भगवान जोगदंड (वय २६, रा. वाघेश्वर कॉलनी, च-होली), प्रदीप मनोज मसळेकर (वय २४, रा. काटे कॉलनी, आळंदी) अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी (दि. २९) रात्री साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.