न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच देहूतील शीळा मंदिर लोकार्पणासाठी येऊन गेले. गेली ३० वर्ष जो रस्ता व्यवस्थित नव्हता तो काही तासातच “चकाचक” बनविला गेला. ” बुलडोजर” वापरून जमीन समतल केली गेली.
८ दिवस जिल्ह्याचे प्रशासन मोठ्या लवाजम्यासह सभेची तयारी करत होते. हे करत असताना खर्चाला मात्र मर्यादा दिसून आली नाही. कोरोनानंतर भीषण परस्थितीत देशाची जनता धडपडत असताना सभेसाठी कोट्यावधी रुपयांची उधळण अनावश्यक होती. ५० वर्षांपासून वारकऱ्यांना पायी वारी करताना दगडगोटे टोचत होते. तेव्हा मात्र रस्ता व्यवस्थित करण्याचे प्रशासनाला सुचले नाही.
सभेसाठी मात्र रस्ता करून रेड कार्पेट टाकले गेले. कोट्यवधी रुपये खर्चून व्हीआयपी कल्चरचे पुरेपूर दर्शन देहूच्या वारकऱ्यांना व ग्रामस्थांना दिले गेले. आता सभा झाली. सभेच्या पंचतारांकित खुणा मात्र ठळकपणे दिसुम येत आहेत. देहू आणि आजूबाजूच्या खेडयातील मुलांना उत्तम क्रीडांगण गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध झाले नव्हते. हेलिपॅडमुळे काहीअंशी का होईना क्रीडांगणाचा आनंद मुले अगदी मनमुरादपणे.घेत आहेत.