- अन्यथा पोलीस केस करण्याची धमकी; दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- ”सरकारमान्य धान्याचा साठा तुमचा नाही, तुम्ही तो चोरी करून आणलेला आहे. जर तात्काळ ८ लाख रुपये व दर महिन्याला ५० हजार रुपये दिले नाहीत तर खोटी पोलीस केस करणार”, अशी आरोपींनी धमकी दिली.
आरोपीने फिर्यादीस फोन करून प्लॉट १०९, सुबोध शाळेजवळ, संभाजीनगर, चिंचवड येथे बोलावून घेतले. त्यावेळी फिर्यादीकडे आरोपीने वरील मागणी केली.
दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांच्या गोडाऊनचे फोटो काढून फिर्यादी यांना पोलीस केस करण्याची धमकी दिली. लाजपतराय मित्तल (वय ५७ वर्षे, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आशिष पालकर (वय ३९ वर्षे, रा. रविवार पेठ) आणि योगेश वाडेकर (वय ४२ वर्षे, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.