- कासारवाडीत घरावर कब्जा करीत कुटुंबाला धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२२) :- कासारवाडीतील गुलिस्ताननगर येथील फिर्यादीच्या इमारतीत १२ जूनला रात्री साडे आठच्या दरम्यान आरोपी आले. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाऊन रूमचे कुलूप तोडत रुममध्ये शिरून त्यावर कब्जा केला. दरम्यान, फिर्यादीने त्यांना प्रतिकार करीत ‘इमारत आमच्या मालकीची आहे, तुम्ही आमचे परस्पर येथे राहू शकत नाही’ असे सांगितले.
त्यावर आरोपींनी फिर्यादीस तलवार दाखवून ‘तुम मुझे पहचानते नही, इस इलाकेका मै भाई हू, किसीको भी पूछ लो रावण कोण है और रावण की गॅंग क्या है. यहा पर रहोगे तो तुम सबकी मुंडी छाट लुंगा’ अशी धमकी दिली. त्यांना विरोध केला असता आरोपींनी फिर्यादीच्या गळ्याला तलवार लावल्याने ते घाबरून गप्प राहिले. त्यानंतर २४ जूनला पुन्हा आरोपींनी फिर्यादीला घराजवळ अडविले.
‘वो रूम खाली कर दे वरना, तेरी कोई खैर नही, हम तेरी मुंडी काट डालेंगे’ अशी धमकी दिली. याप्रकरणी समशेर आलम बशीर शेख (रा. गुलिस्ताननगर, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सर्फराजताज शेख ऊर्फ रावण (वय २५), शाहबाजताज शेख (वय २३), अरबाजताज शेख (वय २२), जोहल ताज शेख (वय २०), नवाजताज शेख (वय १९) व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.