न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जुलै २०२२) :- इंस्टाग्रामचे चॅटिंग व सोबतचे फोटो फिर्यादीच्या पतीला दाखविण्याची धमकी देत फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार केला. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार मोशीत घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आकाश केरनाथ बदे (वय २३, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.