न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जुलै २०२२) :- संगनमत करून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी दोन पीडित महिलांना आरोपींनी पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांतून स्वतःची उपजीविका भागवली.
पोलिसांना माहिती मिळाली असता छापा टाकून पीडित महिलांची सुटका केली. तसेच साडे तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चिंचवड रेल्वे स्थानकापासून दळवीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत करण्यात आली.
चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनेश वासुमल करमचंदानी (वय २८, रा. विजयनगर, काळेवाडी) याला अटक केली असून रॉकी याच्यावर गुन्हा दाखल आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.