न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२२) :- कुदळवाडीतील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त खिचडी व फराळ वाटप करण्यात आले. आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच आणि वै. हभप वामन महाराज यादव सेवा संस्थेच्या वतीने हा उपक्रम आयोजिला होता.
अनेक भाविक भक्तांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, अशी माहिती आयोजक माजी स्वीकृत सदस्य दिनेश लालचंद यादव यांनी दिली.














