- विलास मडिगेरी यांनी पुन्हा महापालिकेचा बुरखा फाडला..
- पुराव्यासह तक्रारीमुळे राज्य निवडणूक आयोगाने घेतली दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने याद्या फोडताना नियमानुसार व्यवस्थित काम केले नाही. हेतुपुरस्सार, कोणाच्या तरी सांगण्यावरून, राजकीय दबावाखाली, राजकीय हस्तक्षेप होवून, प्रभाग क्रमांक ११ मध्ये अपेक्षित असणारे हजारो नावे ६००० ते ८००० नावे कमी करून प्रभाग क्रमांक १० व प्रभाग ३ मध्ये टाकली असल्याची दाट शंका उपस्थित केली होती. या संदर्भात ८००० पैकी काही उदाहरणं म्हणून पुराव्यासह ५५६ मतदारांचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, भाग क्रमांक, अनुक्रमांक, त्यांचे Epic आय डी, संपूर्ण माहितीसह यादी २२/०६/२०२२ रोजी प्रारूप प्रसिद्धीच्या एक दिवस अगोदर लेखी तक्रार ई मेल वर आणि प्रत्यक्ष शंका /तक्रार पत्र मा.राज्यपाल महोदय, राज्य निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, म न पा आयुक्त या सर्वाकडे दिली /केली होती.
या पुराव्यानिशी तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. या संदर्भात आक्षेपाबाबत उचित कार्यवाही करण्याचे दि: ३०/०६/२०२२ रोजी च्या लेखी आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिल्याचे भाजपचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले आहे. २३/०६/२०२२ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर उदाहरण म्हणून दिलेल्या ५५६मतदारांचे नावे तपासली असता ५५६ नावापैकी
त्यातील ३६३ नावे अन्य प्रभागात म्हणजे प्रभाग ३ मध्ये ९ मतदार, ४ मध्ये ४ मतदार, ९ मध्ये ८५ मतदार, १० मध्ये २६५ मतदार टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदार याद्यामध्ये ६००० ते ८००० हून अधिक मतदारांचे नावे ही राजकीय दबावापोटी, राजकीय हस्तक्षेप होऊन मतदार याद्यांमध्ये फेरफार करून सध्याच्या अंतिम प्रभाग क्रमांक ११ मध्ये अपेक्षित असणारे यामध्ये सेक्टर ३,४,६,७,९,१०,११ व १३ तसेच जय गणेश साम्राज्य, नारायण हठ सोसायटी, प्रिन्सेस विल्ला सोसायटी, पांजारपोळ समोरील गुरुविहार कॉलनी, लांडगेनगर व अन्य अशा या भागातील वास्तव्यास असणारे किती तरी हजारो मतदारांचे नावे खूप मोठ्या प्रमाणात प्रभाग ३ मध्ये -१९७४ मतदार, ४ मध्ये ६०२ मतदार, ९ मध्ये ८७० मतदार, १० मध्ये ३१३५ मतदार, १२ मध्ये ७४ मतदार, १६ मध्ये १०२ मतदार असे एकूण ६७५५ मतदारांचे नावे वरील अन्य प्रभागामध्ये टाकले आहेत. आम्ही २२/०६/२०२२ रोजी ६००० ते ८००० मतदार दुसऱ्या प्रभागात टाकल्याचे लेखी पत्राद्वारे शंका व्यक्त केली होती त्यातील ६७५५ मतदारांची राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या फॉर्म मध्ये हरकत शेवटचे दि: ३/७/२०२२ रोजी पुराव्यानिशी हरकत आम्ही घेतली तसेच प्रत्येक मतदाराचा संपूर्ण नाव पत्त्याचा पुरावा म्हणून प्रत्येकाचा मिळकतकर झेरॉक्स सोबत दिला आहे झेरॉक्सचे एकूण ७००० पानांक सोबत जोडले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने तयार केलेल्या प्रभागरचनेबाबत २५ नोव्हेंबर २०२१ रोजी लेखी शंका व तक्रारपत्र दिले होते. त्या प्रमाणेच हेतुपुरस्सार प्रभागाची फोडाफोड करून प्रभागरचना केली होती. त्याची तक्रार व पाठपुरावा करून आणि सुनावाणी प्राधिकृत अधिका-यांकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका ६२५०/२०२२ द्वारे दाखल केली आहे. त्याची सुनावणी चालू आहे. निर्णय प्रलंबित आहे.
तसेच या संदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे आमच्या मूळ तक्रारी २५/११/२०२१ व १८/०२/२०२२ रोजीच्या गंभीर स्वरूपाचे आहेत म्हणून महानगरपालिका आयुक्त यांना चौकशी आदेश देवून गोपनीय अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर प्रभागरचनेप्रमाणेच इंद्रायणीनगर प्रभागाच्या मतदार याद्या विभाजन देखील हेतुपुरस्कर केले गेले आहे. निवडणूक प्रशासनाने याद्या फोडताना नियमानुसार व्यवस्थित काम केले नाही हे स्पष्ट दिसून येतो आहे.
२२/०६ रोजी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. या संदर्भात पिंपरी चिंवड महापालिका आयुक्त यांना तक्रारीबाबत कार्यवाही करून कळविण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रभागरचना तयार करताना आणि मतदार याद्या फोडताना निवडणूक यंत्रणेचे चुकीचे कामकाज केले आहे. वारंवार चुका निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या कामकाजात सुधारण झालेली नाही. चुकीच्या कार्यप्रणालीचा पुन्हा बुरखा फाटलेला आहे. निवडणूक यंत्रणेने योग्यरित्या व नियमानुसार निवडणुकीचे कामकाज करावे. अन्यथा महानगरपालिका निवडणूक यंत्रणेचा अनागोंदी कारभार थोपविण्यासाठी आणखी कायदेशीर लढा द्यावा लागेल, असेही विलास मडिगेरी यांनी नमूद केले आहे.














