न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२२) :- मुलासह दुधाचे बिल आणण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या आरोपीच्या दुचाकीचा फिर्यादी यांच्या दुचाकीला धक्का लागला. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या पायालाही धक्का लागला. याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने रस्त्यावरील दगड फिर्यादी यांच्या डोक्यात मारला.
यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार शनिवारी (दि. ९) हिंजवडी येथे घडला. उल्हासराव शरदराव देशमुख (रा. आदर्शनगर, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान विठ्ठल साखरे (वय ४१, रा. आदर्शनगर, हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.














