न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२२) :- घरामध्ये एकटे असताना अनोळखी इसमांनी फिर्यादिना सांगितले कि, त्याचे लग्न ठरलेले आहे. तुमच्या हातातील बांगड्या मला दाखवा तुमच्यासारख्या बांगड्या (पाटल्या) मला माझ्या होणाऱ्या बायकोसाठी बनवायच्या आहेत.
तुमच्या हातातील बांगड्या काढून द्या. मला त्याचे फोटो काढून घ्यायचे आहेत, असे म्हणून फिर्यादीची दिशाभूल केली. आरोपी त्यांच्या हातातील ४.४० लाख किंमतीच्या ११ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पळून गेले.
हा प्रकार ९ जुलै रोजी दुपारी सुदर्शननगर येथे घडला. ७३ वर्षीय पीडित महिलेने अज्ञात आरोपीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.