न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- संभाव्य पूर परिस्थितीतील आपत्तीकाळात कोणतीही घटना घडल्यास परिस्थिती हाताळण्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात आठवडाभर पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे पवना नदीपात्रातील पाणी पातळी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती उद्भवल्यास नियोजन करण्यात आले आहे.
आपत्ती काळात सेवा देणाऱ्या शहरातील संस्था, सर्पमित्र, आरोग्य विभाग वैद्यकीय, जलनि:स्सारण, स्थापत्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान, आपनी व्यवस्थापन आदी विभांगाच्या प्रमुखांना तत्पर राहण्यास सांगितले आहे. पूर परिस्थिती कालावधीत घटनास्थळावर पोहोचून योग्य निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.
परिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभाग अंतर्गत समन्वय ठेवण्यास सांगितले आहे. पाऊस पडत असताना पाण्याची पातळी वाढल्यास लगेचच सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत. अस ढाकणे यांनी सांगितले.