न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवार) सकाळ पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. जून महिन्यात पावसाने अक्षरशः दडी मारली होती. पावसाची चिंता नागरिकांना सतावत होती. आपल्यावर पाणी कपातीची कुऱ्हाड निश्चित पडणार असे वाटत असताना, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार आगमन केलं अन् पाणी कपातीचं संकट टळलं.
शहरातून वाहणारी पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहीवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या सोईच्या पालिकेच्या दृष्टीने अणु विद्युत व दूरसंचार विभागामार्फत पूरनियंत्रण कक्षाचे दूरध्वनी / मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहेत, अशी माहिती दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस न-होना यांनी दिली.
पूरनियंत्रण कक्षाचे दूरध्वनी / मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे…
















