न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- फोनवरून नोकरी डॉट कॉम वरून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीस अॅक्सिस बैंकत नोकरी लावण्याचे आमिष आरोपीने दाखवले. त्यासाठी रजिस्ट्रेशन, डिपॉझिट लॅपटॉप, अकाउंट ओपनिंग, एच आर कमिशन, एनओसी, जीएसटी चार्ज अशा वेगवेगळ्या कारणांसाठी एक लाख सात हजार रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. ही घटना ८ ते ११ एप्रिल या दरम्यान मोहननगर चिंचवड येथे घडली. २२ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7858939479 , 8409492759,8527625188 मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.