न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- आकुर्डीतील फॉरमायका कंपनीने विनापरवाना वेगवेगळ्या प्रजातीचे एकूण ९० वृक्ष जेसीबीच्या सहाय्याने काढले आहेत. पालिकेच्या ही बाब निदर्शनास आली आहे.
विनापरवाना वृक्ष काढल्याने पालिकेच्या उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागाने कंपनीला प्रत्येकी वृक्षासाठी ५०,००० अशा एकूण ९० वृक्षांसाठी पंचेचाळीस लाख रुपये शुल्क / दंड आकारण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
संबंधित कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८. कलम २१, पोटकलम १ नुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उद्यान विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















