न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- पतीच्या उपचारासाठी फिर्यादी महिलेने आरोपीकडून उसने घेतलेले चार लाख रुपये परत देण्यासाठी फिर्यादीस ब्लॅकमेल केले. त्रास देण्याच्या हेतूने वारंवार फोन करून शिवीगाळ करीत फिर्यादीचा विनयभंग केला. पाठलाग करून दमदाटी केली.
मोशीतील जय गणेश साम्राज्य चौक, दिघीतील भारतमातानगर येथे ही घटना घडली. महिलेने फिर्याद दिली असून दिघी पोलिस ठाण्यात राकेश अनिल गायकवाड (वय ३१, रा. डोंगरगाव, पेरणे फाटा, ता. शिरूर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.