न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटना, भोसरी विधान सभेचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा मोशीतील साधुराम गार्डन येथे संपन्न झाला. पावसाच्या तडाख्यात देखील अतिशय उत्साहात महिला, भगिनी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शविली.
मेळाव्यास मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर, राज्य सरचिटणीस किशोर शिंदे, राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते यांनी संबोधित केले. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, विभागअध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर संघटक पदी स्वप्नील भोसले (मोशी), जयसिंग भाट (जाधववाडी-मोशी), दत्तात्रय होणकळस (दिघी) यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मनसे उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, राजू सावळे, शहर सचिव रुपेश पटेकर, पिंपरी विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, मनसे महिला सेना शहराध्यक्ष अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहर सचिव सीमा बेलापूरकर, उपशहराध्यक्ष संगीता देशमुख, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, विभाग अध्यक्ष सुजाता काटे, वाहतूक सेना शहराध्यक्ष सुशांत साळवी, शारीरिक सेना शहराध्यक्ष महावीर कर्णावत, विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष अनिकेत प्रभू, विभाग अध्यक्ष प्रतीक शिंदे, शहर संघटिका श्रद्धा देशमुख, वाहतूक सेना उपशहराध्यक्ष नितीन सूर्यवंशी, सचिव शिवकुमार लोखंडे तसेच सर्व उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.














