न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- फोनवरून आरोपींनी फिर्यादी इस्टेट एजंटला पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर जिवे मारण्यात येईल, अशी धमकीही आरोपीने यावेळी दिली.
ही घटना गुरुवारी (दि. १४) रोजी दुपारी एकच्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना घडली. सुरेंद्र अर्जुन मेवानी (वय ४२ वर्ष, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.