- वेश्या व्यवसाय प्रकरणी एकाला अटक; तीन महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- पिंपळे सौदागर येथील एका सोसायटीमध्ये आरोपी आरोग्य मंथन स्पा नावाने स्पा सेंटर चालवत होता. त्यात त्याने तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर आपली उपजीविका भागवली.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. १८) दुपारी छापा मारून कारवाई करत स्पा सेंटर चालक मालकाला अटक केली आहे. तीन महिलांची सुटका केली आहे.
पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनसराज अण्णाराव माने (वय ३५, रा. पाचपीर चौक, काळेवाडी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या स्पा सेंटर चालक मालकाचे नाव आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.