- थेरगावातील बापूजीबुआ उद्यानातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- बागेत खेळण्यासाठी मुलगा गेला असता दाढी व मिशी असणाऱ्या अनोळखी इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलाला जवळ बोलावीले. त्याने मुलाला जवळच्या झाडीत नेऊन त्याच्यावर अत्याचार केला.
ही घटना थेरगावातील बापूजीबुआ उद्यान येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडली. मुलाने आपल्या आईला ही घटना सांगितल्यानंतर अज्ञात इसमावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी बाललैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.