न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- ऑल इंडिया टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनानाईझेशन सलग्न ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनची ५ वी वार्षिक सभा पिंपरी चिंचवडमध्ये संपन्न झाली. रावेत येथील मथुरा बॅंक्वेट हॉलमध्ये झालेल्या वार्षिक सभेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
बैठकीत राज्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभेमध्ये व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, सरकारच्या जाचक अटी, सरकारचे होणारे दुर्लक्ष यावर तसेच व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्यासंदर्भात चर्चा झाली.
या वेळी ऑल इंडिया टेंट डिलर्स वेलफेअरचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशचे रामकिसन दडूशेठ पुरोहीत, ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन सागरभाई प्रल्हाद चव्हाण आणि पदाधिकारी, व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.