न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- मोशी येथील डिमार्टसाठी टेम्पोचालक यांनी (एमएच ०४ एचडी २५६४) या टेम्पोमधून माल आणला होता. टेम्पो सील स्वरूपात असताना तो त्यांनी स्पाईन रोडवरील अश्विनी ह़ॉस्पीटलच्या शेजारी उभा केला होता.
यावेळी चोरट्यांनी फिर्यादीच्या टेम्पोला उलटा टेम्पो पार्क करून सील तोडून टेम्पोतील माल स्वतःच्या टेम्पोत भरला व आरोपी पसार झाले. यामध्ये तब्बल ३ लाख ४७ हजार २३ रुपयांचा माल चोरीला गेला आहे. ही घटना रविवारी (दि. १८) पहाटे साडेतीन वाजता घडली.
विजय अरविंद पराडे (वय ४३ रा. रुपीनगर, तळवडे) यांनी पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस चॉकलेटी रंगाच्या आयशियर कंपनीच्या टेम्पोचा शोध घेत आहेत.