न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- लोणावळ्यातील आपटे गावाताील लेक मॅन्शन बंगल्यात भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच सट्टेबाजांना पकडले. या कारवाईत ५३ हजारांची रोकड, सहा मोबाइल संच, लॅपटाॅप, टॅब असा दोन लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अजय नटवरलाल मिठीया (वय ४७), रवी रसिकभाई रजाणी (वय २६), निपुल देवासीभाई पटेल (वय २८), जिग्नेश गणेशभाई रामाणी (वय ३२), मितेश रमेशभाई सिंधू (वय २७, रा. सर्व रा. राजकोट, गुजरात) यांना अटक करण्यात आले. लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.