- तर, दोघांकडून तलवार आणि कोयता जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- ३१ मे पासून तडीपार असणाऱ्या आरोपींनी आदेशाचे उल्लंघन करत पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. त्यांना अटक केली असता त्यांच्या जवऴून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
यावेळी पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार रुपयांच्या दोन पिस्टल व ३ हजार रुपयांचे ५ जिवंत काडतुसे तसेच एक दुचाकी असा एकूण ९३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रविवारी (दि. १८) रावेत येथील किवळे सर्वीस रोडवर हा प्रकार घडला. अजय अरूण गायकवाड (वय २३) व संभाजी मोहन यमुनवाड (वय २१) दोघे रहाणार भोसले वस्ती, म्हाळुंगे अशी अटक आरोपींची नावे आहेत. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.
दरम्यान राजेश रामगोपाल यादव (वय २३, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याने कोयता सदृश्य हत्यार जवळ बाळगल्याने त्याच्यावर मंगळवारी (दि. १९) सायंकाळी कारवाई करून १०० रुपये किमतीचे कोयता सदृश्य हत्यार जप्त केले. तर, शस्त्र विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघिरे (वय २३, रा. कस्पटेवस्ती, वाकड) याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपये किमतीची एक तलवार जप्त केली.