- आक्षेपार्ह भूमिका नसताना निष्पाप शिवसैनिकांवर पोलीसी बळाचा वापर..
- पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- कट्टर शिवसैनिक शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आणि स्व. बाळासाहेबांच्या तत्त्वांशी कदापि गद्दारी करणार नाही. पक्षाने शून्यातून वैभव निर्माण करून दिले असताना काही गद्दारानी बंडखोरांच्या कळपात जाणे पसंत केले आहे. अशा गद्दार माणसांमुळे शिवसेनेचे काहीही वाकडे होणार नाही. कट्टर शिवसैनिक उद्धव साहेबांना सोडून कोठेही जाणार नाही, असा संताप कट्टर शिवसैनिकांनी आज व्यक्त केला. कोणतीही आक्षेपार्ह भूमिका नसताना निष्पाप शिवसैनिक सय्यद पटेल यांना पोलीसी बळाचा वापर करून कैद केले. त्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये शिवसैनिक एकत्र जमले होते. विनाकारण अटक केलेल्या आमच्या शिवसैनिकाला सोडा अन्यथा आम्हालाही आता टाका, असा पवित्रा उपस्थित शिवसैनिकांनी घेतला होता.
तत्पूर्वी आकुर्डी येथील शिवसेना भवनात आयोजित बैठकीत शिवसैनिकांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी मा आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख सचिन भोसले, शहर संघटिका उर्मिला ताई काळभोर, सह संपर्कप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, निलेश मुटके, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, युवराज कोकाटे, ज्ञानेश्वर भालेराव, हरेश नखाते, विजय गुप्ता, विशाल यादव, अमोल निकम, तुषार नवले, राम पात्रे, रोमी संधू, संदीप भालके, माउली जगताप, नितीन बोंडे, सर्जेराव कचरे, सहदेव चव्हाण, कैलास तोडकर, अनिता तुतारे, वैभवी घोडके, संदीप भालके, गणेश आहेर, सुधाकर नलावडे, युवराज कोकाटे, युनूस शेख, शिल्पा अनपान, दादा नरळे, मयूर फिरके, विशाल चव्हाण, शकील शेख, प्रकाश जाधव, गोरख पाटील, बाळासाहेब मेढे, गणेश वायभट, नरसिंग माने, सावताराम महापुरे, अनिल पलांडे, राहुल पलांडे,स्वप्नील डेरवडकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन भोसले म्हणाले, ज्यांची पार्श्वभूमीच एका पक्षातून दुसर्या पक्षात उड्या मारण्याची आहे. त्यांच्याकडून शिवसेनेला अजिबात अपेक्षा नाहीत. खाल्लेल्या मिठाला जो जगात नाही. त्याचा अस्त झाल्याशिवाय राहणार नाही. लायकी नसताना उद्धव साहेबांनी विश्वास ठेऊन एकदा नव्हे तर दोनवेळा खासदार केले. कार्यकर्त्यांचे बळ पाठीशी नसताना शिवसेनेने ताकद दिली. त्यामुळेच त्यांची राजकिय डाळ शिजली. आता पक्षाशी गद्दारी करून बंडखोर गटात उडी ठोकली. अशा फुटीरवादी व्यक्तींमुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध केला.
अनंत को-हाळे म्हणाले, उद्धव ठाकरे साहेबांना सोडून जाणा-याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांची बैठक घेतली असताना कट्टर शिवसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. रागाच्या भरात काही आक्षेपार्ह शाब्दिक भाष्य झाले. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढवून एका खोट्या गुन्ह्यात एका शिवसैनिकाला अडकवण्यात आले. सामान्य कार्यकर्त्याची कोणताही चूक नसताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बंडखोर गटाकडून कट्टर शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. शिवसेना अशा कारवायांना कदापि घाबरणार नाही.
संतोष सौंदणकर म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडून आमच्यावर उर्मट राजकारण सुरू आहे. सत्तेचा दुरुपयोग करून सामान्य शिवसैनिकांना त्रास देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अशा कारवायांना शिवसेना कदापि भीक घालणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू. पक्षाने वैभव निर्माण करून दिले असताना गद्दारी केली जाते. ज्यांच्या रक्तात गद्दारी आहे त्यांना कोणीच रोखू शकणार नाही. त्यांच्यामुळे सय्यद अमीन शेख यांच्यावर झालेली कारवाई सूड उगवण्यासाठी करण्यात आली आहे. शहरातील संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही.