न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२२) :- संत साहित्याचे अभ्यासक व मावळ तालुक्यातील चिखलसे जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक बिशप डाॅ. सुनिल साठे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, उत्कृष्ट अशा समाज प्रबोधन तसेच प्रभावी शैक्षणिक धार्मिक कार्याची दखल घेतली आहे.
डाॅ. कृष्णा चौहान फाऊंडेशनतर्फे “राष्ट्रीय रत्न पुरस्कार” इंटरनॅशनल मोटीवेशनल स्पिकर डाॅ.परीन सोमानी व फाऊंडेशनचे संस्थापक डाॅ.कृष्णा चौहान यांच्या हस्ते अंधेरी मुंबई येथील मेयर्स हाॅल येथे सन्मानपूर्वक देण्यात आला.
बिशप डाॅ.सुनिल साठे यांनी हा सर्वोच्च सन्मान देऊन आपल्या कार्याचे गौरव केल्याबद्दल डाॅ.कृष्णा चौहान फाऊंडेशनचे आभार मानले व अशा पुरस्कारामुळे समाजासाठी नेहमीच चांगले,प्रेरणादायी कार्य करण्यासाठी सर्वांना बळ, प्रेरणा मिळेल असे माध्यमांशी बोलताना सांगितले.