- थेरगावातील शिवतीर्थनगरमधील प्रकार; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात तसेच मोका अंतर्गत येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगार आहे. फिर्यादी यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. ३ मे रोजी आरोपीने फिर्यादीला फळ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी २० हजार रूपयांची खंडणी मागितली.
खंडणी न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पुण्यातील विशेष सत्र न्यायालय (मोका) यांच्या आदेशानुसार, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. थेरगावातील शिवतीर्थनगर येथे हा प्रकार घडला.
लक्ष्मण कृष्णदेव शेरखाने (वय ३४, रा. सुंदर कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी उर्फ नितीन राकेश सौदाई (वय ३०, रा. सुभाषनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.