न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- १९ जुलै रोजी रात्री पावणेआठ वाजता फिर्यादी यांना मोबाईलवर एक मेसेज आला. त्यावर एमएसईबी बील अपडेट ऑफीसर असल्याचे सांगितले. तुमच्या घराच्या वीजबीलाचे पेमेंट त्वरीत अपडेट करावे लागेल, अन्यथा आज रात्री तुमचा घरातील वीजपुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगितले.
त्यासाठी क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करायला सांगितला व दहा रूपये अपडेशन्स चार्जेस नेट बँकींग किंवा डेबिट कार्डद्वारे भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनेक ओटीपी पाठविले.
हे ओटीपी शेअर केले नसतानाही फिर्यादी यांच्या पत्नी भारती यांच्या बँक खात्यावरून पेटीएमद्वारे ६० हजार व त्यानंतर एक-एक लाख अशी एकूण दोन लाख ६० हजाराची रोकड ट्रान्सफर झाली. ही घटना पिंपरीत घडली. अनिल पुनमचंद्र भावसार (वय ७४, रा. टेल्को रोड, यशवंतनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.