न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर २० जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना राष्ट्रध्वज भेट देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
याबाबत करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख देशमुख म्हणाले, ‘‘संपूर्ण कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना २० बाय ३० इंच आकारातील राष्ट्रध्वज घरांवर लावण्यासाठी भेट देण्यात येणार आहे. रोख अथवा धनादेशाद्वारे भरणा करणाऱ्यांना त्वरित राष्ट्रध्वज देण्यात येईल. तर ऑनलाइन भरणा करणाऱ्यांना करसंकलन विभागाचे कर्मचारी राष्ट्रध्वज घरपोच देतील.’’