न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडून देहू नगरीच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले.
शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.