न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर श्रध्दांजली सभा आयोजित केली होती.
कष्टकरी महिला पुरुषांनी मेणबत्ती पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली व झालेल्या हल्याबद्दल दहशतवादी अतिरेक्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. ‘शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, कार्यध्यक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, संदिपान झोबाडे, विक्की तामचिकर, सविता लोंढे, मंगल जाधव, रेशमा काळे, सुशिला मोरे, कमल घोडके, मंगल कांबळे आदी उपस्थित होते.