- विमाननगर येथे सुरू असलेला पब मधील धांगडधिंगा मनसेने पाडला बंद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
विमाननगर (दि. १७ फेब्रु.) :- भारतावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सर्व देश शोकाकुल असताना, विमाननगर येथील काही पबमध्ये दारू पिऊन महिला व पुरुषांचा धांगडधिंगा सुरू होता.
पबच्या कर्कश आवाजाची दखल घेत, परिसरातील पब व बार मध्ये जाऊन मनसेच्या वडगावशेरी मधील कार्यकर्त्यांनी पबचा आवाज मनसे स्टाईलने बंद केला.
यावेळी मनसेचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील विशाखा गायकवाड, प्रभाग अध्यक्ष गणेश पाटील, मनोज ठोकळ, अरुण येवले, सनी पंजाबी, निखिल पवार आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.