न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- इंद्रायणीनगर, एम.आय.डी.सी. भोसरी येथे एक इसम पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती बुधवारी (दि. २७) पोलिसांना मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा लावुन आरोपीला ताब्यात घेतले. वेदांत विलास माने (वय २५ वर्षे, रा. साईघाम हॉस्पीटल मागे, लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व त्याचे पाठीवरील सँगमध्ये तिन गावठी पिस्टल व चार जिवंत राऊंड असा एकुण १०२१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. पुढील तपास एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन करीत आहेत.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहा पोलीस उप आयुक्त प्रशात अमृतकर, सहा पोलीस उप आयुक्त पदमाकर घनवट, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रांजेंद्र निकाळजे, पोलीस उप – निरीक्षक बी. आर. गोसावी सहा. पोलीस फौजदार शिंदे, सहा. पोलीस फौजदार वाव्हळे, पो. हवा / ५०६ गवारी, पोलीस हवा.६४६ प्रितम वाघ, पो.हवा./९०१ शेख, पो.कॉ./१५९७ मुळुक, पो. को / २१८४ आत्तार, पो.कॉ. / २३८२ शेळके, पो.हवा. माळी सायबर गुन्हे शाखा यांच्या पथकाने केली आहे.