न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गरीब विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. त्यासाठी चौथी फेरी सुरू करण्यात आलेली आहे. ही फेरी २७ तारखेपर्यंत चालणार होती. यामध्ये पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. आता ३० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
आत्तापर्यंत २ हजार ७९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी १७४ खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यासाठी एकूण ३ हजार २५५ जागा रिक्त आहेत.
गरीब विद्यार्थ्यासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत २ हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, ५७८ जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी २२ तारखेपासून चौथी फेरी सुरू करण्यात आली होती. या फेरीसाठी आता ३० जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.