न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- थेरगाव येथील डी मार्टजवळ कृष्णा भेळ नावाच्या दुकानामध्ये २६ जुलैला संध्याकाळी ५.५५ च्या दरम्यान आरोपीने त्याच्याजवळ २ लाख ५२ हजार ४०० रुपये किंमतीचा ६३१ ग्रॅम वजनाचा आफिम हा अमली पदार्थ व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवला होता.
अफिम आठ दिवसापूर्वी आरोपीच्या वडीलांनी राजस्थान येथून ट्रकने पाठवला होते. दोघांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश अहिर, (वय २२, रा. काळेवाडी, मूळ रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. रामेश्वर अहिर (रा. खेडा इराणी, ता. धूमला, जि. चितोडगड, राजस्थान) हा दुसरा आरोपी आहे.















