न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- पिंपरीतील डिलक्स चौक ते काळेवाडी पुल रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या विनापरवाना ४० पत्राशेड, टपऱ्यांवर निष्कासनाची / जप्तीची कारवाई करण्यात आली.
पालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालय, धडक कारवाई पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. अंदाजे ४०००.०० चौ.फु. क्षेत्रफळावर ही कारवाई करण्यात आली.
कारवाईसाठी २ जेसीबी, २ क्रेन, ३ डंपर, २० मजूर, पिंपरी पोलीस स्टेशनचे ५ पोलीस कर्मचारी, ५ वाहतूक पोलीस कर्मचारी, मनपाचे २२ पोलीस कर्मचारी, २४ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ग क्षेत्रीय अधिकारी विनोद जळक यांच्या नियंत्रणाखाली व ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, १ कार्यालयीन अधीक्षक, ८ मनपा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.