न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडळातील पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवारी (दि. ३०) आणि रविवारीही (दि. ३१) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
सध्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडळातील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी व रविवारीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले आहे. सर्व वीजग्राहकांना घरबसल्या चालू व थकीत बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाइल अॅपद्वारे ‘ ऑनलाइन ‘ सोय उपलब्ध आहे.