न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरासंह कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा तपासणी पथकाच्या पाहणीत समोर आला आहे. ७६ डॉक्टरांनी हजेरीपत्रकावर सहीच केली नसल्याचे तसेच २ डॉक्टरांनी ओळखपत्र आणि ४ डॉक्टरांनी अॅप्रन परिधान केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना तपासणी पथकातर्फे नोटीसा देण्यात येणार आहेत.
वायसीएम मधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना कामावर आल्यावर बायोमॅट्रीकसह हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. वायसीएममधील कर्मचाऱ्यांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या तपासणी पथकाने मंगळवारी (दि. २६) वायसीएम रुग्णालयाची पाहणी केली. डॉक्टर ओपीडीत हजर होते काय? किती कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत? डॉक्टरांसह कर्मचारी यांचे रूग्णांशी वर्तन कसे आहे? कर्मचारी कामावर असताना ओळखपत्र घालतात का? कर्मचारी गणवेश घालतात? हजेरी पत्रकावर वेळेत सही करतात का? हे तपासले. यामध्ये ७६ डॉक्टर तर इतर १७ कर्मचारी होते. बायोमॅट्रीक हजेरी झाल्यावरही डॉक्टरांनी हजेरीपत्रकावर सही करणे बंधनकारक आहे. रुग्ण तपासताना डॉक्टरांनी अँप्रन घालणे, ओळखपत्र आवश्यक आहे.
याबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना पत्र पाठवून शिस्त न पाळणाऱ्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांवर आपल्या अधिकार कार्यकक्षेत कारवाई करण्याची शिफारस केली जाईल. कारवाईचा अहवाल मागविण्यात येणार आहे. यापुढेही शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
– वामन नेमाणे, सहायक आयुक्त…